नीट-पीजी समुपदेशन यंदा चार टप्प्यांत, आजपासून सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेडिकलच्या ऑल इंडिया कोटा जागांसाठी नीट-पीजी समुपदेशनाची प्रक्रिया उद्या, 12 जानेवारीपासून सुरू होणार असून यंदा प्रथमच ही प्रक्रिया चार टप्प्यांत पार पडणार आहे. यंदा समुपदेशनासाठी पहिल्या दोन फेऱ्यांनंतर मॉप-अप आणि स्ट्रे व्हेकन्सी राऊंड अशा एकूण चार फेऱ्या घेतल्या जाणार आहेत. यापूर्वी समुपदेशनाच्या दोनच फेऱ्या होत होत्या.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मेडिकल काwन्सिलिंग कमिटीमार्फत (एमसीसी) समुपदेशन सुरू केले जात आहे. यंदा समुपदेशन फेऱ्यांमध्ये सहा बदल केले जाणार आहेत. ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे देशाच्या वैद्यकीय सेवेला बळकटी येईल,’ असे पेंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे. नीट-पीजी परीक्षा 11 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात जाहीर झाला. त्यानंतर सुमारे 45 हजार पदव्युत्तर जागांसाठी विद्यार्थी समुपदेशन सुरू होण्याची वाट पाहत होते. समुपदेशनाच्या दुसऱ्या फेरीनंतर शिल्लक जागा राज्यांना परत केल्या जात होत्या. यंदा मात्र तसे होणार नाही. तसेच या वेळी पीजी डीएनबी जागांसाठी समुपदेशदेखील एमसीसीद्वारे केले जात आहे.

कोटय़ातील रिक्त जागा ऑल इंडिया कोटय़ात समर्पित होणार

यापूर्वी एनआरआय/मुस्लिम अल्पसंख्याक/जैन अल्पसंख्याकांच्या रिक्त जागा मोप-अप फेरीनंतर डीम्ड विद्यापीठांकडे समर्पित केल्या जात होत्या. त्यानंतर विद्यापीठ त्यांच्यासाठी स्ट्रे व्हॅकन्सी फेरीचे समुपदेशन करीत होत्या, मात्र यंदा सर्व जागा ऑल इंडिया कोटय़ामध्ये समर्पित केल्या जाणार आहेत.

असे असेल आरक्षण

एससी      15 टक्के

एसटी      7.5 टक्के,

ओबीसी    27 टक्के (पेंद्रीय OBC यादीनुसार)

ईडब्ल्यूएस       10 टक्के

दिव्यांग प्रवर्ग   5 टक्के