
नीट पेपरफुटी प्रकरण तपासात आणखी धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी मनीषा हवालदार हिने तपास यंत्रणांचा संशय आपल्यावर येऊ नये, यासाठी पुरावे नष्ट करण्याचे नियोजनबद्ध प्रयत्न केल्याचे समोर आले असून, तिने प्रश्नांच्या नोट्स जाळल्या. तर, याअनुषंगाने केलेले मेसेज डिलीट केले आहेत.
मनीषा हवालदार यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतर एनटीएच्या पॅनेलवरील या प्राध्यापिकेच्या भूमिकेबाबत संशय गडद झाला असून, तपास यंत्रणांनी तिच्या हालचाली आणि संपका&ंची पडताळणी सुरू केली आहे.



























































