
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री नेहा पेंडसे नेहमीच तिच्या हटके स्टाईल आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे नवीन ट्रॅडिशनल फोटोशूट शेअर केले असून, तिचा हा साडीतील नवा लुक सध्या चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. या फोटोंमध्ये नेहाने अतिशय सुरेख असा रॉयल पर्पल रंगाचा नेट-ऑर्गनझा साडी लुक केला आहे. या साडीवर सोनेरी रंगाची नाजूक फ्लोरल एम्ब्रॉयडरी आणि चमचमणारे सिक्विन वर्क केले असून, त्यावर तिने मॅचिंग स्लीवलेस सिक्विन ब्लाउज वेअर केला आहे. या सुंदर लुकला अधिक आकर्षित बनवण्यासाठी तिने कानात मोत्यांचे पारंपरिक हेव्ही झुमके, हातात कडा, आणि केसांचा नीटनेटका बन बांधून कपाळावर छोटीशी टिकली लावली आहे. तिचा हा रॉयल आणि सोबर लुक सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.


























































