
नेपाळमध्ये बालेन शहा यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर 24 तासांच्या आत माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक यांना अटक करण्यात आली. गेल्या वर्षी ‘जेन-झी’ निदर्शनादरम्यान हलगर्जीपणाचा ठपका ओली यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
‘जेन-झी’ आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात 77 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी करणाऱया आयोगाने ओली यांच्यासह लेखक व इतर पोलीस अधिकाऱयांवर ठपका ठेवला होता. हा अहवाल स्वीकारून बालेन शहा यांनी पुढील कारवाईला मंजुरी दिली. त्यानंतर ओली यांना भक्तपूर जिह्यातील त्यांच्या निवासस्थानावरून, तर रमेश लेखक यांना पहाटे 5 वाजता सूर्यविनायक भागातील निवासस्थानावरून अटक करण्यात आली.
























































