
उत्तर प्रदेशच्या एका कोरड्या विहरीत दोन हजार, पाचशे आणि शंभर रुपयांच्या नव्या नोट्या आढळल्या आहेत. या नोटा जमा करण्यासाठी गावकऱ्य़ांची एकच झुंबड उडाली आहे.
उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात भीतरगावात एक जुने शिवमंदिर आहे. या शिवमंदिराजवळ एक जुनी विहीर असून ती पूर्णपणे आटली आहे. या विहीरीजवळ काही मुलं खेळत होती तेव्हा त्यांना दोन हजार, पाचशे आणि शंभर रुपयांच्या नवीन नोटा आढळल्या. या मुलांनी दोरीला फळांचा रस लावून या नोटा बाहेर काढल्या. या विहीरीत खाली गवत आले असून मोबाईल टॉर्चच्या साहाय्याने पाहिले असता अनेक नोटा दिसल्या. तसेच एक मोबाईलही दिसत होता.
ही बाब जेव्हा गावात पसरली तेव्हा गावकऱ्य़ांनी या नोटा काढण्यासाठी एकच गर्दी केली. आतापर्यंत 8 -10 हजार रुपयांच्या नोटा या विहरीतून काढल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या नोटा इथे कशा आल्या याचे कारण अद्याप कळालेले नाही.



























































