अनुसूचित जाती व नवबौद्धांना जमीन खरेदीसाठी १०० टक्के अनुदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना चार एकर कोरडवाहू जमीन खरेदीसाठी २० लाख तर दोन एकर बागायती शेतीसाठी १६ लाख रुपये देण्यासोबत या रकमेवर १०० टक्के अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत घेण्यात आला.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वावलंबन योजनेची रक्कम दुप्पट तर अनुदान शंभर टक्के मिळेल. आता नवीन निर्णयाप्रमाणे भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थ्याला उत्पन्नाचे साधन म्हणून शेतजमीन खरेदी करता येईल. यासाठी चार एकर कोरडवाहू जमिनीसाठी प्रति एकर पाच लाख रुपयांप्रमाणे असे एकूण २० लाख रुपये तर ८ लाख रुपये प्रति एकरप्रमाणे दोन एकर बागायती शेतजमीन खरेदी करण्यासाठी १६ लाख रुपयांचे थेट अनुदान देण्यात येईल.