
दिल्ली कार स्फोट प्रकरणात तपास यंत्रणेने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. या स्फोटातील मुख्य आरोपी आणि जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी डॉ. उमर याचा फरिदाबादचा धौज येथील साथीदार शोएब याला अटक केली आहे. शोएब या प्रकरणातील सातवा आऱोपी आहे. तपास यंत्रणेच्या तपासात शोएबने स्फोटापूर्वी दहशतवादी उमरला आश्रय दिला होता आणि त्याला लॉजिस्टिक सपोर्ट देखील पुरवला होता.
दिल्लीतील कार बॉण्बस्फोटात 13 लोकांचे प्राण गेले आणि वीसहून अधिकजण जखमी झाले. याआधी एनआयने बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी उमरसह सहा आरोपींना अटक केली होती. शोएब याच्या अटकेनंतर तपास यंत्रणेच्या तपासात महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शोएब याने बॉम्बस्फोटासाठी लागणारी सामग्री आणून देण्यासाठी मदत केली होती. त्यानेच नूह येथे त्याच्या मेहुणी अफसानाशी ओळख करुन दिली होती. हिला घरात तो भाड्याने राहत होता आणि सर्व जबाबदारी त्याची घेतली होती. 10 नोव्हेंबरच्या स्फोटापूर्वी दहा दिवस तो अफसानाच्या घरातच राहत होता. स्फोटाच्या दिवशी तो नूहं येथून दिल्लीला गेला होता. आता एनआयए त्याला विद्यापीठ आणि नूह येथे घेऊन जाणार आहे.






























































