
राजधानी नवी दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या 30 वर गेली आहे. त्यामुळे सुरक्षिततेसाठी दिल्ली सरकारने 31 मार्चपर्यंत लॉक डाऊनची घोषणा केली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तसेच 1 मार्चपासून परदेशातून नवी दिल्लीत 35 हजार प्रवासी आले आहेत. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याचे दिल्ली सरकारने स्पष्ट केले आहे.
परदेशातून आलेल्या या प्रवाशांना 14 दिवस घरातच विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यापैकी कोणात्याही प्रवाशामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांना रुग्णालयात आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा सरकराने दिला आहे. या 35 हजार प्रवाशांच्या संपर्कात आलेल्यांवरही नजर ठेवण्यात येणार आहे. दिल्लीत आढळलेल्या 30 कोरोना रुग्णांपैकी 6 जण दिल्लीबाहेरील आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी दिल्लीतही 7 जिल्ह्यामध्ये 31 मार्चपर्यंत लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे.
























































