Maruti Brezza मारुतीची नवीन कार लॉन्च, इलेक्ट्रिक सनरूफसह दिले शानदार फिचर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मारुतीची सर्वात बहुचर्चित एसयूव्ही ब्रेझा कार (Maruti Brezza) आज लॉन्च करण्यात आली. यात अनेक नवे फिचर्स देण्यात आले आहेत. खास बाब म्हणून सनरुफसोबत (Maruti’s First Car with Sunroof) येणारी मारुतीची ही पहिलीच कार आहे. या कारमध्ये काळ्या रंगाचे इलेक्ट्रिक सनरुफ (Electric Sunroof) देण्यात आले आहे.

मारुतीने आपल्या या कारच्या नावामधून Vitara हा शब्द हटवला आहे. ही कार आता फक्त ब्रेझा या नावाने ओळखली जाईल. मारुतीने 2016 मध्ये पहिल्यांदा ही कार लॉन्च केली तेव्हा यात फक्त डिझेल इंजिन देण्यात आले होते, परंतु नंतर कंपनीने पेट्रोल व्हर्जनही लॉन्च केले. नवीन ब्रेझा कारही पेट्रोल इंजिनसह उपलब्ध असून यात Smart Hybrid टेक्नॉलॉजी हा पर्यायही ग्राहकांकडे असणार आहे.

नवीन ब्रेझा कार 1.5 लीटर ड्युअल जेट के सीरिज पेट्रोल इंजिनसह येणार आहे. हेच इंजिन नुकत्याच लॉन्च झालेल्या Ertiga आणि XL6 मध्येही देण्यात आले आहे. हे इंजिन 101 bhp मॅक्स पॉवर आणि 137Nm पीक टॉर्क जनरेट करते. यात 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6 स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे.

लुक में धांसू है नई ब्रेजा

या कारचे आणखी खास वैशिष्ट्य म्हणजे यात काळ्या रंगाचे इलेक्ट्रिक सनरुफ देण्यात आले आहे. यात 9 इंचाचा फ्लोटिंग SmartPlay Pro+ इंफोटेनमेंट स्क्रीन, हेडअप डिस्प्ले (Head Up Display) आणि 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच अॅड्रॉईड आणि अॅपल कार प्ले सारखे फिचर्सही यात आहेत. ही कार नऊ रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात सुरेक्षाच्या दृष्टीने 6 एअरबॅग्स देण्यात आले असून होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, एबीएस, रियर पार्किंग कॅमेरा आणि सेन्सर्स, स्पीड मॉनिटर सारखे 40 कनेक्टेड कार फिचर्स देण्यात आले आहेत.

नव्या ब्रेझामध्ये ड्युअल जेट आणि ड्युअर व्हीव्हीटी टेक्नॉलॉजी देण्यात आली असून एका लिटर पेट्रोलमध्ये ही कार 20.5 किलोमीटर धावते असा दावा कंपनीने केला आहे. या गाडीला स्पोर्टी लूक देण्यात आला असून ड्युअल प्रोजेक्टर हेडलँप आणि एल शेप एलईडी डीआरएल यात देण्यात आले आहे. मारुतीच्या नव्या ब्रेझाची किंमत सध्या बाजारात असणाऱ्या मॉडेलपेक्षा थोडी जास्त आहे. याची किंमत 7.99 लाखांपासून सुरू होत आहे. वेगवेगळ्या व्हेरिएंटनुसार याची किंमत ठरते. कारची बुकिंग सध्या सुरू झाली असून 11000 रुपये देऊन तुम्ही याचे बुकिंग करू शकता.

ये हैं नई ब्रेजा की कीमतें