Be Ready For The Party

135

>> पूजा पोवार, फॅशन डिझायनर

नववर्षाची पूर्वसंध्या. समस्त तरुणाई पार्टीच्या प्लॅनिंगमध्ये व्यग्र आहे. कोणत्याही पार्टीची शान म्हणजे त्यासाठी करण्यात येणारी वेशभूषा. चला तर मग… Be Ready For The Party.  

कुर्तीमधला फॅशनेबल लूक

 • कुर्तीची उंची पुढील बाजूने कमी आणि मागील बाजूने लांब असते. कोणत्याही पार्टीला जाताना पँण्टवर ही कुर्ती घालू शकता. हिला ‘टेल कुर्ती’ म्हणतात.
 • ‘ए’ स्टाईल कुर्तीचा आकार वरून निमुळता आणि खालच्या बाजूने पसरलेला असतो. खालून घेर असल्याने चुडीदार किंवा लेगिनवर ही कुर्ती सुंदर दिसते. कॉलेजवयीन तरुणींमध्ये हा लूक प्रसिद्ध आहे.
 • कोणत्याही पार्टीसाठी अनारकली कुर्ती वापरू शकता.
 • रॉयल लुकसाठी ‘गाऊन कुर्ती’ वापराव्यात. या लांबीला उंच असतात आणि यात प्रिंटेड आणि डिझायनर असे दोन प्रकार मिळतात.
 • शर्टप्रमाणे डिझाईन असलेल्या कुर्तींना ‘शर्ट कुर्ती’ म्हणतात. या कुर्ती मुलींना आवडणार्‍या फॅब्रिक आणि डेनिमच्या कपड्यांमध्ये मिळतात. सध्या या कुर्तींना विशेष मागणी आहे.
 • कुर्तीवर जॅकेट ही क्रेझ सध्या आहे. याला ‘कुर्ती विथ जॅकेट’ असे म्हणतात.
 • साध्या कुर्तीप्रमाणे पण कुर्तीवर पॉकेट असणार्‍या फॅशनेबल ‘कॉटन कुती’ची मागणी सध्या वाढत आहे. साधी पण स्टायलीश लूक या कुर्तीमुळे येतो.
 • जीन्स किंवा पलाझोवर वापरायला ‘शॉट कुर्ती’ बरी वाटते. कोणत्याही वयोगटात शोभून दिसते.

 

फिरायला जाल तर

 • ट्राऊझर त्यावर स्पार्कलिंग टॉप, वेलवेट ब्लेझर आणि किनी जिन्स किंवा प्लेन काळा ड्रेस, त्यावर ब्राईट किंवा कलरफुल कानातले छान दिसतील.
 • पांढरा, काळा, चांदेरी, मेटॅलिक, गुलाबी, वाईन, लाल, हिरवा, करडा अशा रंगाच्या कपडय़ांची निवड तुम्ही करू शकता. 

घरगुती समारंभ

 • बाहेर जाण्यापेक्षा घरी राहून मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्यासोबत नवे वर्ष आनंदाने साजरे करायला हल्ली काही जण पसंती देतात. अशावेळी जम सूट वापरता येईल.
 • फर जॅकेट, लेदर पँट तुम्हाला नव्या वर्षाचा लुक देईल.
 • पेन्सिल स्कर्ट, मॅक्सी ड्रेस यामध्ये घरी सहजरित्या वावरू शकता.
 • पायजम- सूट दोन्ही एकाच रंगाचे. यावर ब्लेझरप्रमाणे जॅकेट घालू शकता.
 • गाऊनप्रमाणे लांब फ्रॉक घालण्याचीही सध्या फॅशन सुरू आहे.
 • मुलांनी घरातील कार्यक्रमात कॅज्युअल कपडे वापरावेत. यामध्ये चिनोज पँट, त्यावर पांढरा शर्ट, कॅझ्युअल स्वेटर किंवा जॅकेट, चिनोज ट्रेंडी वाटेल. 

 

New Year Eve  संध्याकाळची पार्टी

 • मित्रमैत्रिणींबरोबर नव्या वर्षाचा आनंद घेणार असाल तर तुमचे व्यक्तिमत्त्व आकर्षक आणि चारचौघात उठून दिसणे महत्त्वाचे असते. अशा वेळी तरुणी सिक्वेन्स ड्रेस, वेलवेट ड्रेस घालणे गरजेचे आहे.
 • पार्टीला मुली मिनी ड्रेसमध्ये फ्रॉक, स्कर्ट घालतात.
 • सिक्वेन्स ड्रेसमध्ये ब्लेझर, सिक्वेन्स स्कर्ट, टँक टॉप, मेटालिक पावर सूट, सिक्वेन्स पँट, जँकेट यासोबत सिलोटे हिलचे शूज वापरले तर पार्टीत ग्लॅमरस लूक दिसायला मदत होईल.
 • फॉर्मल ड्रेस कोड असेल तर ब्लॅक ब्लेझर, ब्लॅक पँट, पांढरा शर्ट, ब्लॅक शूज, रंगीबेरंगी टाय या लूकमध्ये मुले क्लासी दिसतील.
आपली प्रतिक्रिया द्या