बँक ऑफ बडोदाचे कर्ज महागले,एचडीएफसीने बचत व्याज वाढवले

35

सामना ऑनलाईन,मुंबई

एचडीएफसी बँकेने विविध खात्यातील जमा रकमेवर नवीन व्याजदर लागू करण्याची घोषणा मंगळवारी केली. विविध कालावधीसाठी बँकेत जमा असलेल्या 1 कोटीपर्यंतच्या रकमेवरील व्याजदरात 0.5 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँक ऑफ बडोदाने कर्जावरील विविध कालावधीसाठीचा व्याजदर .10 टक्के केला आहे. पाच ते आठ वर्षे आणि आठ ते दहा वर्षांतील ठेवीवरील व्याजदर सहा वरून साडे सहा करण्यात आला आहे. तीन ते पाच वर्षावरील ठेवीवरील व्याजदर 7.1 वरून 7.25 करण्यात आला आहे. एका वर्षातील ठेवीवरील व्याजदर 7.25 वरून 7.3 करण्यात आला आहे. एक वर्षासाठी घेतलेल्या सीमांत कर्जावर व्याजदर 8.65 टक्के असून अन्य कर्जावर प्रति दिन व्याजदर 8.15 टक्के, दरमहा 8.20 तर तीन महिन्यांसाठी 8.30 टक्के आहे.

आपली प्रतिक्रिया द्या