आता बिनधास्त विसरा पासवर्ड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुगलच्या विविध सेवांचा अनेकजण वापर करतात. आपल्या मोबाईल मधील डेटा सुरक्षित राहावा यासाठी युजर्स स्ट्राँग पासवर्ड क्रिएट करतात. मात्र, कधीकधी आपण या अकाउंट्सचे पासवर्ड विसरू जातो. त्यानंतर तो पासवर्ड रिकव्हर करण्यासाठी मोबाईल नंबर, जीमेल आयडी टाकणे असे बरेच काही करावे लागते.

आता या कटकटीपासून युजर्सची सुटका होणार आहे. कारण गुगलने Passkey नावाचे नवीन अपडेट आणले आहे. गुगल Passkey सह अॅप्स आणि वेबसाईटवर बायोमेट्रिकचा वापर करू शकता. यामध्ये फिंगरप्रिंट, फेस स्पॅन किंवा स्क्रीन
लॉक पिन याचा समावेश होतो. हे तंत्रज्ञान आधीपेक्षा सुरक्षित असून ऑनलाइन अटॅक आणि फेक स्पॅमपासून बचाव करते. ही सेवा पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी अजून बराचवेळ लागणार आहे.