नव्या वरोरा-वणी मार्गावर कारचा भीषण अपघात, डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव शहरातील प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नव्या महामार्गावर कारला विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या हायवा ट्रकने धडक दिली. यामध्ये दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. डॉ. अश्विनी गौरकार मारेगाव येथील स्त्रीरोगतज्ज्ञ असून त्यांचे पती डॉ. अतुल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. वरोरा तालुक्यातील शेंबळ गावाजवळ हा अपघात झाला आहे. दोघांना भद्रावती ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं आहे. हे डॉक्टर दाम्पत्य चंद्रपुरातून गुडीपाडवा साजरा करून मारेगावला जात असताना अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस घटनास्थळी पोहोचले, पुढील तपास वरोरा पोलीस करत आहेत.