
सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयएचे पथक सोमवारी रात्री मुंबई पोलीस आयुक्तालयात धडकले. त्या पथकाने गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागातील सचिन वाझे यांच्या केबिनची मंगळवारी पहाटेपर्यंत झाडाझडती घेतली. यावेळी वाझे यांच्या केबिनमधून लॅपटॉप, आयपॅड, मोबाईल, संगणक तसेच काही कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. या कारवाईमुळे आयुक्तालयात खळबळ उडाली आहे.
शनिवारी रात्री सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयएने आपला तपास अधिक गतिमान केला आहे. रविवार आणि सोमवार असे दोन दिवस एनआयएने चार अधिकारी आणि तीन कॉन्स्टेबल अशी सातजणांची चौकशी केली. तर यापैकी एपीआय रियाज काझी यांची आज तिसऱया दिवशीदेखील एनआयएकडून चौकशी करण्यात आली. तत्पूर्वी सोमवारी रात्री आठच्या सुमारस एनआयएचे पथक मुंबई पोलीस आयुक्तालयात धडकले. त्यानंतर त्या पथकाने सचिन वाझे हे सीआययूमध्ये ज्या केबिनमध्ये बसत होते, त्या केबिनची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुंबई गुन्हे शाखेचे काही अधिकारीदेखील उपस्थित होते. पहाटे चारच्या आसपास एनआयएचे पथक वाझे यांच्या केबिनमधील मोबाईल, लॅपटॉप, संगणक व काही कागदपत्रे घेऊन आयुक्तालयाबाहेर पडले.
ते वाझे असावे असे एनआयएला वाटते
‘अॅण्टेलिया’जवळ स्पह्टकांची स्कॉर्पिओ पार्प केल्यानंतर तेथे एक व्यक्ती पीपीई किट घालून चालताना सीसीटीव्हीत पैद झाली. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून सचिन वाझेच आहेत असा एनआयएला दाट संशय आहे. त्यामुळे एनआयए तो सिन रिक्रिएट करून ती व्यक्ती सचिन वाझेच आहे का हा पडताळून पाहतील, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.
रियाज काझी यांची भूमिका संशयास्पद
सचिन वाझे ठाण्यातील ज्या साकेत सोसायटीत राहतात त्या सोसायटीच्या सीसीटीव्ही पॅमेऱयाचे दोन डीव्हीआर रियाज काझी यांनी सोसायटीला रीतसर अर्ज करून ताब्यात घेतले होते. तसेच बनावट नंबर प्लेट बनवली गेली ती आणायलादेखील काझी गेले होते. त्यामुळे वाझे जे काही करत होते त्याची काझी यांना संपूर्ण माहिती असणार असा एनआयएला संशय आहे, असे सूत्रांकडून समजते.
मनसुख हिरेनवर संशय होता
विक्रोळी येथून स्कॉर्पिओ चोरीली जाणे. त्यानंतर विक्रोळी पोलीस ठाण्यात कारचोरीची तक्रार देणे यासह हिरेन यांनी वेळोवेळी चौकशीत माहिती दिली त्यावरून हिरेन यांची भूमिका संशयास्पद वाटत होती. हिरेन यांच्या पत्नीने जबाबत सांगितले की, स्कॉर्पिओ चार महिने वाझे यांच्याकडेच होती. मग ही बाब त्यांनी चौकशीवेळी का लपवली? अशा काही बाबी आहेत की, ज्यामुळे हिरेन संशयास्पद वाटत होते परंतु त्यांच्या बाबत अधिक माहिती मिळण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे हिरेन यांच्याबाबत फार काही समजू शकले नाही असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
मर्सिडीज ताब्यात
एनआयएने आज सायंकाळी काळय़ा रंगाची मर्सिडीज ताब्यात घेतली. कारमध्ये स्कार्पिओची बनावट नंबर प्लेट, शर्ट, 5 लाखांची रोकड आणि नोटा मोजण्याचे मशीन सापडली. ही कार पुणाची, याचा शोध घेत असल्याचे आयजी अनिल शुक्ला यांनी सांगितले.
कोणालाही पाठीशी घालणार नाही
सचिन वाझे प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. महाविकास आघाडी सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही. या प्रकरणाची एटीएस आणि एनआए अशा दोन तपास संस्थांकडून चौकशी सुरू आहे. कोण कोणत्या पक्षात होतं किंवा नव्हतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तपासात जे काही समोर येत आहे त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
आघाडीत मतभेद नाहीत
वाझे प्रकरणावरून राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये पुठलेही मतभेद नाहीत. आज सकाळीच बैठक झाली. त्यात नाना पटोले, मुख्यमंत्री, मी, एकनाथ शिंदे, गृहमंत्री अनिल देशमुख सगळेच होते.
महाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमासाठी एकत्र आले आहे. जनतेच्या हितासाठी जे जे काही शक्य आहे ते सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी जे निर्णय घ्यायचे असतील ते घेतले जातील, असे स्पष्टीकरण पवारांनी दिले आहे.
मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचे हा प्रत्येक पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे. अधिकाऱयांबाबत जो काही निर्णय घ्यायचा असेल तो राज्याचा प्रमुखांना अधिकार आहे. आतापर्यंतच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तशा प्रकारे निर्णय घेताना पाहिले आहे. जी काही चौकशी सुरू आहे, तपासात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, परंतु चौकशीआधी कोणाला शिक्षा करावी हेदेखील योग्य नाही, असेही अजित पवार म्हणाले.
दरम्यान वाझेंनी वकिलांना भेटण्यास दिले जात नसल्याचेही कोर्टात म्हटले होते. यावर कोर्टाने केवळ चौकशीच्या वेळी वकिलांना दुरून पाहण्याच्या अंतरावर उपस्थित राहण्याची मुभा दिली.
वाझेंचे तीन अर्ज फेटाळले
सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टात तीन अर्ज केले होते. एनआयए कार्यालयात सीसीटीव्ही नाही. कोणत्याही सरकारी अधिकाऱयाला सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय अटक करता येत नाही व मूलभूत प्रक्रियेचे पालन न केल्यास अटक कारवाई बेकायदा आहे. असे मुद्दे मांडणारे तीन अर्ज वाझे यांच्यामार्फत एनआयए कोर्टात करण्यात आले होते. मात्र आज विशेष एनआयए न्यायालयाने तिन्ही अर्ज फेटाळले.
‘एनआयए’ने विनाकारण बातम्या पसरवू नयेत!
अनिल अंबानी यांच्या बंगल्याबाहेरील गाडीत सापडलेली स्फोटके आणि सचिन वाझे यांच्या चौकशीबाबत एनआयएने निष्कर्षाप्रत पोहोचल्यानंतरच बोलावे. दररोज विनाकारण बातम्या पसरवू नयेत, असा सल्ला जलसंधारणमंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे. तपास प्रक्रियेविषयी काहीच माहिती नसलेल्या समाजातील लोकांपर्यंत चुकीचा संदेश जातो. त्यामुळे एनआयएने प्रथम संपूर्ण तपास पूर्ण करावा. या प्रकरणाचा संपूर्ण छडा लागला की अधिकृतपणे सर्वांसमोर येऊन बोलावे. केंद्रीय यंत्रणांनी तपास जरूर करावा. मात्र, वर्तमानपत्रांमध्ये अमक्याने हे केलं, ते केलं अशा बातम्या सोडू नयेत, असे जयंत पाटील म्हणाले.





























































