
टीसीएस कंपनीतील महिलांवरील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील संशयित निदा खान हिला सोमवारी न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
दीड महिना फरार असलेल्या निदा खानला गुरुवारी, 7 मे रोजी छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली. पोलीस कोठडी संपल्याने सोमवारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले. टीसीएस कंपनीतील महिलांना धार्मिक शिक्षण देणे, विशिष्ट धर्माच्या चालीरीतीने वर्तन करण्यास भाग पाडले. पीडितेला विशिष्ट पेहराव करण्यास भाग पाडण्याचे कृत्य तिने केले.
पीडित महिलेची ओळख पुसून टाकण्यासाठी तिचे हानिया असे नामकरण केले होते आदी आरोप निदावर आहेत. तिच्याविरुद्ध दाखल गुह्यात कट रचणे आणि धार्मिक भावना दुखावणे या कलमांची वाढ केली आहे.
निदा खानकडून एकूण 171 क्लिप्स हस्तगत करण्यात आल्या आहेत, त्याची तांत्रिक तपासणी करण्यासाठी, तसेच तिचे आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र, न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी दिली, तिची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात होणार आहे.






























































