
सामना ऑनलाईन । मुंबई
फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून ओळख निर्माण करून, दुप्पट पैसे देण्याबरोबरच अमेरिकेत जाण्यासाठी 20 हजार पौंड देण्याचे आमिष दाखवून महिलेला फसवणाऱ्या नायजेरियन दांपत्याला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या गुह्यात त्यांना साथ देणाऱ्या एका रिक्षाचालकालादेखील अटक करण्यात आली.
2017 च्या डिसेंबरमध्ये एका 57 वर्षीय महिलेची त्यांच्या फेसबुक मेसेंजरवर डॉनल्ड टॉड नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. त्यावेळी त्याने आपण अमेरिकन नागरिक असून मरीन इंजिनीअर असल्याची ओळख सांगितली होती आणि fिवश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने कस्टममध्ये आपले सोने, चांदी व रोख रकमेचे पार्सल अडकले असून ते सोडविण्यास पैसे दिल्यास त्याची दुप्पट रक्कम देईन, शिवाय अमेरिकेला जाण्याकरिता 20 हजार पौंड इतकी रक्कम देईन असे आमिष त्याने महिलेला दाखविले. त्याच्या आमिषाला बळी पडून महिलेने तो सांगेल त्या विविध बँक खात्यांमध्ये 74 लाख 20 हजार इतकी रक्कम भरली. पैसे मिळाल्यानंतर आरोपीने महिलेशी संपर्प करण्याचे बंद केले. फसवणूक झाल्याचे कळताच महिलेने माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शर्मिला सहस्रबुद्धे, प्रमोद खोपीकर, एपीआय रविकिरण नाळे, उपनिरीक्षक दीपक साळुंखे, नीलेश यशवंतराव, युनिट 8 चे चिंचोलकर, युनिट 6 चे लामखंडे व पथकाने गुह्याचा तपास केला. महिलेने ज्या बँक खात्यात पैसे भरले अशा एकूण 30बँक खात्यांचा अभ्यास केला. मिझोराम, हैदराबाद व दिल्ली या राज्यांतील बँक खाती गुह्याच्या उद्देशाने उघडल्याचे निष्पन्न झाले.
नवी मुंबईतील रिक्षाचालक रडारवर
सखोल चौकशीत नवी मुंबईतील उलवे, न्हावाशेवा येथील रिक्षा, टॅक्सीचालक अशाप्रकारचे गुन्हे करण्यासाठी नायजेरियन नागरिकांना मदत करीत असल्याचे समोर आले. अशोक बोराडे (40) हा रिक्षाचालक गेल्या अनेक महिन्यांपासून एका नायजेरियन इसमाच्या संपर्कात असल्याचे व त्याच्याकडून अनेक वेळा पैसे घेतल्याचे उघडकीस आले. मग अशोकला ताब्यात घेतल्यानंतर त्या महिलेला आमरा ओबेसोग्यू (32) व त्याची पत्नी खिस्ताबेल लिबेह (30)यांनीच फसविल्याचे स्पष्ट झाले. या दोघांनी पुण्यातह असा गुन्हा केला होता. तेथेही त्यांना अटक झाली होती. आरोपींकडून 13 मोबाईल, एक मोडेम, एक राऊटर, एक डेटा कार्ड, एक लॅपटॉप जप्त केले आहे.


























































