नायजेरियन ड्रग्ज तस्करांना बेड्या, मुंबई पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईत येऊन श्रीमंत तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढणाऱ्या 3 नायजेरियन ड्रग्ज तस्करांना मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने पकडले आहे. नायजेरियन ड्रग्ज तस्कर नायजेरियाहून मुंबईत येऊन पब, हाय प्रोफाइल हॉटलमध्ये जाऊन तरूणांना ड्रग्जच्या जाळ्यात ओढत होते. पोलिसांनी या तिघांना रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून 152 ग्रॅम कोकीन जप्त केले आहे.

मुंबई पोलिसांना नायजेरियन ड्रग्ज तस्करांनांबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे परिमंडळ 11 च्या विशेष पथकाने सापळा रचून मालवणीच्या म्हाडा वसाहत परिसरात त्यांना ड्रग्ज सह रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात साडे पंधरा लाख रुपये आहे. चुक्वू फिलिप्स गॉडवीन (32), चुकवे मेका डॉनियल अजाह (24) आणि माइकल ओगबन्ना कौसी (22) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांना कोर्टात हजर केले असता तिघांनाही 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.