‘नीट’ परीक्षेत मालवणचा आशिष झांटये राज्यात प्रथम

वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नीट’ परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. त्यात मालवणच्या आशिष अविनाश झांटये याने 710 गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. मालवण येथील डॉक्टर दाम्पत्य डॉ. अविनाश आणि डॉ. शिल्पा झांटये यांचा आशिष हा सुपुत्र. डॉक्टर कुटुंबातील आशिष यांने वैद्यकीय प्रवेश क्षेत्रातील नीट परीक्षेत मिळवलेल्या यशाने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आशिषने नीट परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल मालवणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मालवण आणि कट्टा येथील वराडकर इंग्लिश कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या आशिषचे या यशासाठी सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या