निलंगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढत जाणाऱ्या डिझेल आणि पेट्रोल च्या भाववाढीच्या निषेधार्थ निलंगा येथे काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो परंतु मोदी सरकारला याचा विसर पडत असलेला दिसून येत आहे. तसेच देशामध्ये हुकुमशाही प्रमाणे डिझेल, पेट्रोल, गॅसचे दर वाढवून हे सरकार मानवनिर्मित संकट निर्माण करून जबरदस्तीने शेतकऱ्यावर लादत आहे. याच्याच निषेधार्थ निलंगा मतदार संघातील शेतकरी तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन केले.

यावेळी दयानंद चोपणे, सोनाजी कदम, प्रकाश पाटके, महेश चिक्राळे, लाला पटेल, शेटकार अप्पा, सुरेंद्र धुमाळ, झरकर सर, बालाजी मुगळे, अमोल सोनकांबळे, बालाजी भुरे, प्रसाद झरकार, अलीम सौदागर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.