नितीशकुमार म्हणाले, जो दारू पिणार तो मरणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दारू शरीरासाठी अत्यंत वाईट आहे. दारूचे सेवन लोकांनी करू नये. जो दारू पिणार तो मरणार, असे विधान बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले आहे. दारूबंदी मागे घेणार नाही. दारूमाफियांवर कठोर कारवाई करणार असेही त्यांनी स्पष्ट केले.

बिहारमध्ये दारूबंदी आहे. मात्र छपरा जिह्यात विषारी दारू पिल्यामुळे आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे. दारूबळीवरून भाजपने विधानसभेत गोंधळ घातला. तसेच आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱया झडत आहेत. यावर बोलताना केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी बिहारमध्ये दारू देवासारखी आहे. दारू राज्यामध्ये सगळीकडे आहे, पण दिसत कोणालाही नाही, असे विधान केले होते.

आज पत्रकारांशी बोलताना नितीशकुमार यांनी बिहारमधील दारूबंदीच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे सांगितले. दारूबंदीचा अनेकांना फायदा झाला आहे. मोठय़ा संख्यने लोकांनी दारू सोडली. त्यांनी आनंदाने हा निर्णय स्वीकारला, असे त्यांनी सांगितले.