मोदी म्हणाले नितीश कुमारच होणार मुख्यमंत्री, आम्ही आमच्या वचनावर ठाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहार निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. भाजपला 74 तर जदयूला 43 जागा मिळाल्या आहेत. भाजपला मित्रपक्षापेक्षा अधिक जागा मिळाल्या तरी मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार आहे असे भाजपने या पूर्वी जाहीर केले आहे. आता आम्ही आमच्या वचनावर ठाम आहोत असे भाजपने म्हटले असून नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार भाजपने जाहीर केले आहे.

भाजप नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी म्हणाले की नितीश कुमारच मुख्यंत्री होणार यात वादच नाही. नितीश कुमार मुख्यमंत्री होतील असे आम्ही वचन दिले होते, या वचनावर आम्ही ठाम आहोत. कोणी जास्त जागा जिंकतं कोणी कमी, हे निवडणुकीत होत असतं. पण या सत्तेचे आम्ही समान भागीदार आहोत असेही सुशील कुमार मोदी म्हणाले.

भाजपला जदयुपेक्षा अधिक जागा मिळाल्या, त्यावर भाजप आता मुख्यमंत्रीपदावर दावा करणार का? असा प्रश्न विचारला जात होता. आता सुशील कुमार मोदी यांनी जाहीर केल्याने या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे.

243 जागा असलेल्या बिहारमध्ये राजदला सर्वाधिक म्हणजेच 75 जागांवर विजय मिळाला आहे. त्यानंतर भाजप 75 तर जयदुला 43 जागा मिळाल्या आहेत. तर लोजपला अवघी एक जागा मिळाली आहे.