मुंबईत मासे कापण्यास बंदी नाही! महापौर, प्रशासनाकडून स्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोणत्याही प्रकारचे मासे कापून ग्राहकांना देण्यावर पालिकेने बंदी घातलेली नसल्याचे आज महापौर रितू तावडे आणि पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे कोळी बांधवांना दिलासा मिळाला आहे.

वाकोला येथील मच्छी बाजारात मासे कापल्याने कचरा, दुर्गंधी पसरत असल्यामुळे ग्राहकांना मासे न कापता द्यावेत असे निर्देश पालिका अधिकाऱयांनी दिल्याचा आरोप या ठिकाणच्या कोळणींनी केला होता. याबाबत दैनिक ‘सामना’सह प्रसारमाध्यमांत वृत्तही प्रसिद्ध झाले होते. या पार्श्वभूमीवर महापौर रितू तावडे यांनी वाकोला मच्छी मार्पेटला भेट देऊन संवाद साधला. तुम्ही बिनधास्त मासळी कापा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे आश्वासन त्यांनी कोळी बांधवांना दिले.

शिव संचार सेनेचाही पाठपुरावा

मच्छी कापण्यावर बंदी घालण्याचा निर्णय कायद्यानुसार चुकीचा आहे. शिवाय या निर्णयामुळे पारंपरिक मच्छी व्यवसाय करणाऱया कोळी बांधवांवर उपासमारीचे संकट येईल. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी शिवसेनाप्रणीत शिव संचार सेनेने केली आहे. याबाबत पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना निवेदनही दिल्याचे शिव संचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे यांनी सांगितले.

कोणी काय आणि कशा प्रकारे खाणार हे आता गुजराती, मारवाडी आणि भैया ठरवणार का? मुंबईचे भूमिपुत्र असलेल्या कोळी बांधवांवर केलेला हा अन्याय आहे. असे आदेश देणाऱया अधिकाऱयावरही कारवाई झाली पाहिजे.

किशोरी पेडणेकर, विरोधी पक्षनेत्या