ई-बोर्डिंग पासवर होणार आंतरराष्ट्रीय विमान प्रवास, 1 सप्टेंबरपासून इमिग्रेशनचा नवीन नियम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करण्यासाठी आता विमानतळावर प्रवाशांना इमिग्रेशन क्लिअरन्ससाठी प्रत्यक्ष बोर्डिंग पास सादर करण्याची किंवा इमिग्रेशन शिक्का घेण्याची गरज भासणार नाही, प्रवासी केवळ त्यांच्या मोबाईल फोनमधील ई-बोर्डिंग पास दाखवून इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण शकतील. यामुळे आता आंतरराष्ट्रीय प्रवास करताना बोर्डिंग पासची छापील प्रत सोबत ठेवण्याची गरज उरणार नाही, हा नवा नियम येत्या 1 सप्टेंबर 2026 पासून लागू केला जाणार आहे.

नव्या नियमानुसार, प्रवासी त्यांच्या मोबाईल पह्नमध्ये सेव्ह केलेला ई-बोर्डिंग पास दाखवून इमिग्रेशन काउंटरवर मंजुरी मिळवू शकतील. इमिग्रेशन सुलभ, जलद आणि डिजिटल करणे हा या नव्या नियमामागील उद्देश आहे. परंतु, प्रत्यक्ष बोर्डिंग पास असलेल्या प्रवाशांनासुद्धा कोणतीही अडचण येणार नाही. ते त्यांच्या छापील प्रतींसह प्रवास करू शकतील. नवीन सिस्टम लागू झाल्यानंतर प्रत्यक्ष बोर्डिंग पासवर इमिग्रेशनचे शिक्के मारले जाणार नाहीत. विमानतळ चालक, संबंधित हितधारक आणि सीआयएसएफ यांना या नव्या प्रणालीबद्दल माहिती देण्यात आली आहे. सर्व संबंधित संस्थांना नवीन डिजिटल प्रणालीनुसार आवश्यक तयारी करण्यास सांगितले आहे.