ईपीएफवरील व्याज दरात बदल नाही, सरकारची 8.25 टक्क्याला मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील सात कोटींहून अधिक नोकरदारांना सरकारने कोणतीही आनंदाची बातमी दिली नाही. केंद्र सरकार पीएफ खात्यात जमा असलेल्या व्याजदरात वाढ करेल, अशी अपेक्षा होती. परंतु सरकारने ईपीएफवरील व्याजदर 8.25 टक्केच ठेवल्याने खातेदारांना आधीच्या प्रमाणे व्याजदर मिळेल. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2025-26 साठी या व्याजदराला गुरुवारी मंजुरी दिली आहे.