मालमत्ताधारकांना शास्ती माफी नाही : उपायुक्त लहारे 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर 

महापालिकेची मालमत्ता कराची थकबाकी ही 239 कोटीवर गेली आहे. या वेळेस शास्तीमाफी न देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला असून उद्या पसून थकबाकीदारांना नोटीसा बजावण्याची कारवाई सुरु करणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे उपायुक्त लहारे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

उपायुक्त लहारे म्हणाले की, मालमत्ता कराची थकबाकी ही मोठ्या प्रमाणात आहे. 1 लाखाच्या पुढे थकबाकी असलेल्यांची नावे सुमारे 400 आहेत. ही नावे आम्ही वेबसाईटवर प्रसिध्द केलेली आहे. शास्तीसह थकबाकी ही 239 कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये नागरिकांना शास्तीमाफी होईल अशी अपेक्षा होती. मात्र आज सकाळी महापलिकेचे आयुक्त यांनी सावेडी प्रभाग कार्यालयात भेटही दिल्या होत्या त्यावेळेला वसुलीचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी शास्तीमाफीचा निर्णय होणार नसल्याचे श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले असल्याने उपायुक्त लहारे यांनी सांगितले.

यावर्षी महानगरपालिकेने 63 कोटी रुपये वसुल केले आहेत. 97 कोटी 96 लाख रुपयांची रक्कम ही शास्तीची आहे. अत्तापर्यंत 10 कोटी रुपये वसुल झाले आहेत. जे थकबाकीदार आहेत. त्यांना नोटीसा बजावण्याचे आदेश आम्ही चारही प्रभाग अधिकार्‍यांना दिले आहेत. नोटीस देऊनही जे कोणी रक्कम भरणार नसतील त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या जातील व त्यांना सिलही ठोकले जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच ज्या मालमत्ता धारकांच्या बिलांमध्ये दुरुस्ती असेल ती निश्‍चिपणे केली जाईल त्या करीता नियुक्त केलेल्या समिती तो निर्णय घेईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ज्या मालमत्ता धारांकांकडे मोठी थकबाकी आहेत अशांची नावे आम्ही फ्लेक्स बोर्डवर लावण्याचा आमचा विचार आहे, ज्यांच्याकडे थकबाकी आहे त्यांनी ती भरली पाहिजे, शासकीय कार्यालयांकडे 3.50 कोटी ररुपयांची थकबाकी आहे. जिल्हारुग्णालयांपासून एनक खात्यांचा यामध्ये समावेश आहे, त्यांनाही नोटीसा बजावणाचे आदेश आम्ही दिले असल्याचे उपायुक्त लहारे यांनी सांगितले.

नगर शहरातील घणकचरा संदर्भात जे जे प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. ते तत्काळ सोडवले पाहिजेत, तसेच ज्या गाड्या बंद आहेत. त्या दुरुस्त करण्याचे आदशेही देण्यात आले असल्याचे त्यांची यावेळी सांगितले.