डॉ. राहुल पाटील, विशाल कदम यांचे उमेदवारी अर्ज दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी शेवटच्या दिवशी शिवसेना, भाजप-रिपाई महायुतीचे परभणी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार डॉ. राहुल पाटील व गंगाखेड मतदार संघातील महायुतीचे उमेदवार जिल्ह्राप्रमुख विशाल कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. परभणीत महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांना घेऊन डॉ. राहुल पाटील तर गंगाखेडात प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत विशाल कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात यावेळी महायुतीचे उमेदवार डॉ. राहुल पाटील यांच्यासह भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. विजयराव गव्हाणे, भाजपा जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, शिवसंग्रामचे नेते सुभाषदादा जावळे, राजू कापसे पाटील, जि.प. सदस्य गजानन देशमुख, रवी देशमुख, उपजिल्हाप्रमुख सदाशिव देशमुख, संजय गाडगे, तालुकाप्रमुख नंदू पाटील आवचार, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, विश्वास कऱ्हाळे, गटनेता चंदू शिंदे, नगसेवक प्रशास ठाकूर, सुशील कांबळे, विशू डहाळे, रामजी तळेकर, विठ्ठल तळेकर, बाळराजे तळेकर, दिलीप ताडकळसकर, महिला आघाडीच्या विधानसभा संघटक अंबिका डहाळे, संजय रिझवाण, सुभाष पांचाळ, संग्राम जामकर आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

आमदार डॉ. राहुल पाटील यांनी आज अर्ज दाखल केल्यानंतर सर्वसामान्य जनतेवर आपला प्रचंड विश्वास असल्याचे सांगितले. परभणीचा विकास करायचाच आहे, ही आपली भावना आहे. विरोधकांचे षडयंत्र फोल ठरणार आहे. विरोधक आजच चारीमुंड्या चित झाले आहेत. विरोधकांच्या छातीत धडकी भरविणारी गुरुवारची रॅली होती. विरोधकांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गंगाखेड विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विशाल विजयकुमार कदम यांनी शक्तीत्रप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला. गंगाखेडचे ग्रामदैवत श्री चिंतामणी मंदिराचे दर्शन घेऊन ढोल-ताशे व आतीश बाजी व हजारो शिवसैनिक व महायुतीच्या प्रमुख नेते व कार्यकत्र्यांच्या उपस्थितीत भव्य रँली काढण्यात आली. या रॅलीत प्रचंड महायुतीचे कार्यकर्त्यांसह पदाधिकारी सहभागी झाले होते. उमेदवारी दाखल करण्यासाठी परभणीचे खासदार संजय जाधव, माजी आमदार हरीभाऊ लहाने, तालुकाप्रमुख अनिल सातपुते, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अभय चाटे, राजेश देशपांडे, राभप्रभू मुंढे, सभापती बालाजी देसाई, विठ्ठल रबदडे, गणेशराव रोकडे, अॅड.व्यंकट तांळे, जि.प. सदस्य डाँ. सुभाष कदम, महिला जिल्हा संघटक सखुबाई लटपटे, सुनिता घाडगे आदींसह महायुतीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.