
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) ही देशातील सुरक्षित आणि लोकप्रिय योजना आहे. करमुक्त परताव्यासाठी अनेक जण या योजनेचा लाभ घेतात. मात्र जर एखाद्याचे खाते मॅच्युअर होण्यापूर्वी खातेधारकाचा मृत्यू झाला, तर त्याचा कायदेशीर वारस खात्यातले पैसे काढू शकतो. पीएफ खातेधारकाचा वारस डेथ क्लेम आणि आवश्यक कागदपत्रे जमा करून पैसे काढू शकतो. यासाठी त्याला फॉर्म जी आणि खातेधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र द्यावे लागेल. काही प्रकरणांमध्ये असे होते की पीपीएफधारकाने कुणालाही नॉमिनी केलेले नसते. अशा परिस्थितीत त्याचा कायदेशीर वारस मृत्यू दावा दाखल करू शकतो. परंतु मृत्यूच्या प्रमाणपत्रासोबत त्याला उत्तराधिकार प्रमाणपत्र सादर करावे लागते.




























































