
बॉलिवूडमध्ये आपल्या बेफाम नृत्याने अल्पावधीत प्रसिद्ध झालेली नोरा फतेही नेहमीच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असते. नुकतीच तिच्या कुसूकुसू या गाण्याची चर्चा होती. आता ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
नोरा सध्या एका गायकाच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा रंगत आहेत. तिचे आणि त्या गायकाचे गोव्यातले फोटो व्हायरल होत आहेत. ते एका समुद्र किनाऱ्यानजीक एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत.
हा गायक म्हणजे गुरू रंधावा. दोघंही सध्या गोव्यात एका नवीन व्हिडीओ शूटसाठी गेले आहेत. यापूर्वी ते दोघंही नाच मेरी रानी या म्यूझिक व्हिडीओमध्ये एकत्र दिसले होते.
View this post on Instagram
त्यांचे गोव्याच्या किनाऱ्यावरचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता गुरू आणि नोराच्या अफेअरच्या चर्चा रंगात आल्या आहेत. काहींनी तर चक्क त्यांच्या लग्नाची तारीख कधी अशीही विचारणा केली आहे. तर काही जणांना हा फक्त व्हिडीओसाठीचा स्टंट असावा असं वाटत आहे.




























































