
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
नोटाबंदी आणि राफेर करारावरून काँग्रेस भाजपवर जोरदार निशाणा साधत आहे. देशभरात विविध भागात काँग्रेस प्रवक्ते आणि नेत भाजपवर हल्ला चढवत आहेत. गुरुवारी कैलास मानसरोवर यात्रेवर जाण्यापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत भाजप सरकारवर तिखट शब्दात हल्ला चढवला. ‘नोटाबंदी हा जुमला नसून महाघोटाळा आहे’, अशी खोचक टिका राहुल गांधी यांनी केली.
काँग्रेस अध्यक्षांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या ताज्या अहवालाचा हवाला देत नोटाबंदी म्हणजे मोदी सराकराच महाघोटाळा असल्याचे टिकास्त्र सोडले. देशातील बड्या-बड्या उद्योगपतींचे काळे धन पांढरे करणे हा नोटाबंदीचा खरा उद्देश होता असा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यामुळे नोटाबंदी ही काही चूक नव्हती तर बड्या उद्योपतींना काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग होता, असे राहुल गांधी म्हणाले.
नोटाबंदींचा निर्णय 15-20 कर्जबाजारी उद्योगपतींच्या भल्यासाठी घेण्यात आला होता. मोदींनी गरिबांच्या खिशातील पैसा काढून उद्योगपतींच्या खिशात टाकला आणि हेच मोदींचे लक्ष्य होते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच त्यांनी आपल्या मित्रांचा काळा पैसा पांढरा करण्याचे काम केले. अमित शहा संचालक असलेल्या अहमदाबाद जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँकेने 750 कोटींच्या जुन्या नोटा बदलून दिल्या, असेही राहुल गांधी म्हणाले.
- नरेंद्र मोदी आणि अंबानी यांच्यामध्ये काय डिल झाली – राहुल गांधी
- सरकारी कंपन्या सोडून अंबानींना राफेल विमानांचे कंत्राट का देण्यात आले – राहुल गांधी
- जेपीसीवर जेटलींनी मला उत्तरे देण्याचे टाळले – राहुल गांधी
- राफेल करारासंबंधी जेपीसी (JPC) नेमा – राहुल गांधी
- आरबीआयच्या अहवालानंतर नोटाबंदीचा पर्दाफाश झाला – राहुल गांधी
- नोटाबंदीमुळे काहीही साध्य झाले नाही – राहुल गांधी
- मोदींनी गरिबांचा पैसा उद्योगपतींच्या घशात घातला – राहुल गांधी
- नोटाबंदीचा निर्णय उद्योगपतींच्या भल्यासाठी घेण्यात आला – राहुल गांधी




























































