
कर्नाटकातील साहित्यिक एस.एल.भैरप्पा यांना बुधवारी पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, त्यांचे साहित्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिचित असून नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असल्यामुळेच आपल्याला पद्म पुरस्कार मिळाला.
कर्नाटकातील मंत्री एसटी सोमशेखर यांनी भैरप्पा यांना फोनवरून पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याचे वृत्त दिले होते. हे वृत्त ऐकल्यानंतर साहित्यिक भैरप्पा यांनी आनंद व्यक्त केला असून त्यांनी हा पुरस्कार म्हणजे म्हैसूरच्या जनतेचा सन्मान असल्याचे म्हटले आहे. भैरप्पा यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करताना म्हटले की मोदी सरकार हे देशाला लाभलेले सर्वोत्तम सरकार आहे. मोदी यांना 2029 पर्यंत बहुमत मिळायला हवे असे म्हणताना भैरप्पा म्हणाले की त्यानंतर मोदी यांनी त्यांच्यासारखे गुण असलेल्या दुसऱ्या नेत्याला पंतप्रधानपदासाठी तयार करायला हवे. मला हा पुरस्कार मिळाला म्हणून मी मोदी सरकारची तारीफ करत नसल्याचेही भैरप्पा यांचे म्हणणे आहे.