जोकोविचच्या प्रवेशनाटय़ाचा दुसरा अंक सुरू, ऑस्ट्रेलिया-सर्बियाच्या पंतप्रधानांत जोकोच्या व्हिसाबाबत बोलणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियन खुली ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धा सुरू होण्यासाठी एका आठवडय़ाहून कमी अवधी शिल्लक असतानाही नोवाक जोकोविचच्या समावेशाबाबत संभ्रम अद्याप कायम आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने जोकोविचचा व्हिसा पुन्हा रद्द करण्याचा इशारा दिल्यामुळे मंगळवारी ऑस्ट्रेलिया आणि सर्बिया देशाच्या पंतप्रधानांनी जोकोच्या व्हिसा प्रकरणावर चर्चा केली. वैद्यकीय सवलतीच्या आधारे लसीकरणाविना मेलबर्नला दाखल झालेल्या सर्बियन जोकोविचला विमानतळावर अडवण्यात आले. जोकोविचचा व्हिसा ऑस्ट्रेलियन सरकारने रद्द केल्यामुळे हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. सोमवारी न्यायालयाने जोकोविचच्या बाजूने निर्णय दिला.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि सर्बियाच्या पंतप्रधान ऍना ब्रनबिच यांच्यात यासंबंधी दूरध्वनीवरून संभाषण झाले. “मॉरिसन यांनी जोकोविचचा व्हिसा रद्द करण्यामागची कारणे आणि कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आखण्यात आलेल्या नियमांची माहिती ऍना यांना दिली. जोकोविचबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल.