
फोन पेने आपल्या यूजर्ससाठी एक खास फिचर सुरू केले आहे. या फिचरमुळे यूजर्सला पैशांचा व्यवहार करण्यासाठी यूपीआय पिन टाकण्याची गरज नाही. यूजर्स स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट किंवा फेस आयडीचा वापर करून पैसे पाठवू शकेल. या फिचरमध्ये सुरुवातीला 5 हजार रुपयांपर्यंतचे पैसे पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. यूपीआयवरून पैसे पाठवायचे असतील तर चार अंकी किंवा सहा अंकी पिन टाकणे आवश्यक आहे. परंतु, फोन पेमध्ये फेस आयडी आणि फिंगरप्रिंटने पैसे पाठवता येतील. फोन पेने ही सुविधा आणण्यामागे पिन नंबर कोणी पाहिल्यास धोका निर्माण होतो. परंतु, बायोमेट्रिकमुळे हा धोका कमी होईल, असे म्हटले आहे. कंपनीने या ‘वन-टच पेमेंट’ पद्धतीसाठी सध्या केवळ 5 हजारांपर्यंतची मर्यादा निश्चित केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने, जर रक्कम पाच हजारांपेक्षा जास्त असेल, तर यूजर्सला यूपीआय पिन टाकावा लागेल. फिंगरप्रिंट आणि फेस आयडीचा वापर करून केवळ पाच हजार रुपये मोबाईलवरून पाठवता येणार आहेत.
कसा कराल वापर?
सर्वात आधी फोन पे यूजर्सने फोन पे अॅप उघडा. त्यानंतर डाव्या बाजूला प्रोफाईल पह्टोवर क्लिक करा. ‘पेमेंट सेटिंग’मध्ये जाऊन मॅनेज पेमेंटवर टॅप करा. या ठिकाणी बायोमेट्रिक पे चा आयकाॅन दिसेल. त्यावर क्लिक करा. ज्या बँक खात्यासाठी ही सुविधा आहे ते निवडा. बायोमेट्रिक पूर्ण करा. सेटअप पूर्ण करण्यासाठी परत एकदा यूपीआय पिन टाका अन् बायोमेट्रिक वापरा, अशी सोपी पद्धत बदल करण्यासाठी फोन पेने दिली आहे.


























































