‘एनआरसी’मधून एकाही हिंदुस्थानी नागरिकाला वगळणार नाही !

458
Smriti Irani Minister of Textiles

केंद्रातील एनडीए सरकार हिंदुस्थानी नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे राष्ट्रीय नागरिक नोंदणी रजिस्टरमधून (एनआरसी) एकाही हिंदुस्थानी नागरिकाचे नाव वगळले जाणार नाही.असे आश्वासन देत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विरोधी पक्षाचे नेते या योजनेबद्दल खोटी माहिती पसरवून जनतेचा बुद्धीभेद करीत असल्याचा टोला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लगावला. एनआरसीत विदेशी घुसखोरांना मुळीच स्थान दिले जाणार नाही ,मात्र हिंदुस्थानी नागरिकांच्या हक्कांवर गदा येऊ दिली जाणार नाही.ममता बॅनर्जी यांचा एनआरसीला विरोध हा पश्चिम बंगालमधील बेकायदा नागरिकांना वाचविण्यासाठीच आहे.याशिवाय केंद्र विरोधी भूमिका घेऊन ममता बंगालला केंद्रीय योजनांच्या लाभापासून वंचित ठेवत असल्याचा आरोपही इराणी यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या