10 ते 18 वयोगटातील मुलामुलींचे जीवन संपवण्याचे प्रमाण वाढले

महाराष्ट्रातही 10 ते 18 वयोगटातली 13 हजारापेक्षा जास्त मुलामुलींनी आत्महत्या केल्या आहेत. या वयोगटातील मुलांच्या आत्महत्यांचे प्रमाण महाराष्ट्रात जास्त आहे. राज्यात सुमारे 1 लाखाहून अधिक शाळा आहेत, तर समुपदेशन केंद्रे फक्त 357 आहेत. हे प्रमाण चिंताजनक असून लहान मुलांच्या आत्महत्येची प्रकरणे रोखण्यासाठी सरकारने काय धोरणे आखली आहेत, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत विचारला. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच आमदारांनी केलेल्या सूचनांची दखल घेऊन निश्चित मार्ग काढू, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.