लाडक्या बाप्पाचा जन्मोत्सव

माघी गणेश जयंतीनिमित्त बुधवारी सकाळपासून ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत राज्यभरातील विविध गणेश मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. यानिमित्ताने मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाईचा झगमगाट आणि विविधरंगी फुलांची सजावट पाहायला मिळाली. यानिमित्ताने  गणेशयाग, होमहवन, भजन, स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायकाची रथयात्रा संपूर्ण दादर परिसरातून काढण्यात आली. या रथयात्रेत हजारोंच्या संख्येने मुंबईकर सहभागी झाले होते. चारकोपचा राजा मंडळात सकाळी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर गणेशजन्म सोहळा रंगला. बालमूर्ती पाळण्यात ठेवून महिलांनी पाळणा गीत गायले.