
ओडीशामध्ये एका तरुणाने क्रूरतेची सीमा गाठली आहे. शेजारच्या घरातील पाळीव कुत्रा सतत भुंकत असल्याने संतापलेल्या तरुणाने त्याच्यावर हल्ला करत गुप्तांगात रॉड घातल्याची घटना घडली आहे. एवढेच नाही तर त्या तरुणाने कुत्र्याच्या मालकीणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. आरोपीने महिलेचे केसं ओढून तिचे कपडे फाडले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ओडिशाच्या भुवनेश्वर परिसरातील आहे. आरोपीचे नाव चंदन नायक आहे. त्याने त्या पाळीव कुत्र्याला धारदार शस्त्राने हल्ला केला. याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रिपोर्टमध्ये महिलेने आरोपी चंदनवर गंभीर आरोप लावले आहेत. महिलेने आरोपी व्यक्तीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
महिलेने पोलिसांना सांगितले की, दुपारच्या वेळी चंदन आणि त्याचे वडिल घरासमोर येऊन आरडाओरड करायला लागले.जेव्हा महिलेने दरवाजा खोलला तर दोघंही तिला शिवीगाळ करायला लागले. महिलेने सांगितले की, त्यांचा गोंधळ पाहून महिलेने कुत्र्याला शांत करायला नकार दिला. त्यामुळे तिचे केस ओढून तिला रस्त्यावर खेचले आणि तिचे कपडे फाडले. त्यानंतर आरोपीने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यात आरोपीच्या वडिलांनी त्याची साथ दिली. महिलेने आरोप केला आहे की, तिच्या कुत्र्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्याच्या गुप्तांगात रॉड घुसवला. या संपूर्ण घटनेबाबत कॅपिटल पोलीसस्टेशनचे इंचार्ज पद्मनाभ प्रधान यांनी सांगितले की, महिलेने गंभीर आरोप केले असून याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. पोलिसांनी आश्वासन दिले की, लवकरच यावर कारवाई करण्यात येईल.
























































