
हिंदुस्थानी वायुसेनेच्या 89 व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून ओडिशामधील रंजन साहू या कलाकाराने आगपेटीच्या काडय़ांपासून एअरक्राफ्ट तयार केले आहे. ‘वेस्टलॅंड वापिती’ या विमानाची प्रतिकृती त्याने तयार केली असून त्यासाठी तब्बल 1360 आगपेटीच्या काडय़ांचा वापर करण्यात आला आहे. त्याची ही कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
कलाकृतीबाबत रंजन साहू म्हणाला, वेस्टलँड वापिती या एअरक्राफ्टची मी प्रतिकृती तयार केली आहे. 33 इंच लांब आणि 40 इंच रुंद अशी ही प्रतिकृती आहे. ही प्रतिकृती साकारण्यासाठी मला पाच दिवसांचा कालावधी लागला आहे. त्याच्या या कलाकृतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. देशाच्या सुरक्षेत सैन्यदलाचे मोठे योगदान आहे. वायुसेना यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. स्वातंत्र्यापूर्वी वायुसेनेला ‘रॉयल इंडियन एअरफोर्स’ असे संबोधले जायचे.





























































