सरकारी कर्मचारी पुन्हा संपाच्या तयारीत; उद्या मुंबईत तातडीची सभा 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याच्या मागणीसाठी सहा महिन्यांपूर्वी संप पुकारलेल्या संपावेळी मुख्यमंत्र्यांनी सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या प्रतिनिधींशी चर्चा करून मागण्यांबाबत लवकरात लवकर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सहा महिने लोटले तरी सरकारकडून 18 पैकी एकाही मागणीवर अद्याप ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी संपाचा इशारा दिला आहे.