Photo – दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशा जयघोषात दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. जिल्ह्यात 19 सार्वजनिक गणपती आणि दहा हजारहून अधिक घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

bappa-3

कोविडच्या सावटाखाली यंदाचा गणेशोत्सव सुरू आहे. कोविडमुळे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला. काल शुक्रवारी गणपती बाप्पांचे आगमन झाले. जिल्ह्यात 108 ठिकाणी सार्वजनिक आणि 1 लाख 66 हजार घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना झाली. घरोघरी मंगलमय वातावरणात बाप्पाची पूजाअर्चा सुरू झाली. यंदाही कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा केला जात आहे.

bappa-4

आज दुपारनंतर दीड दिवसाच्या गणपतींना निरोप देण्यात आला. अतिशय शांततेत दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन स्थळी आगमन होत होते. त्याठिकाणी गणपतीबाप्पाची पूजाअर्चा आणि आरती करून गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येत होते.

bappa-5

रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.त्याचबरोबर रत्नागिरी नगर परिषदेने शहरात कृत्रिम तलावाच्या सहाय्याने पाच ठिकाणी गणेश विसर्जन केंद्र स्थापन केली आहेत.

bappa-6

आपली प्रतिक्रिया द्या