
सामना ऑनलाईन । मुंबई
धारावीच्या मुख्याध्यापक नाला येथील अतिक्रमणांवर पालिकेकडून कारवाई सुरू असताना पालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण तसेच पालिका कर्मचारी व पोलिसांना शिवीगाळ आणि धक्काबुक्कीची घटना मंगळवारी घडली होती. या प्रकरणी धारावी पोलिसांनी रत्नवेळू मुत्तस्वामी देवेंद्र (40) याला अटक केली, तर 10हून अधिक जणांवर गुन्हे दाखल केले.
पालिकेचे दुय्यम अभियंता रितेश भदाणे यांच्या तक्रारीवरून धारावी पोलीस ठाण्यात रत्नवेळू देवेंद्र, प्रतीक जाधव, सुमिता डुकरे, प्रियंका शर्मा, पल्लवी डुकरे, प्राजक्ता जाधव, सुनंदा डुकरे तसेच अन्य तीन पुरुष व पाच महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी रत्नवेळू याला अटक झाली असून अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
आपली प्रतिक्रिया द्या