
सामना प्रतिनिधी । लातूर
‘एक घर एक झाड’ या योजनेचा शुभारंभ येथील प्रभाग क्रमांक १८ मधुन करण्यात आला. या अंतर्गत प्रभागातील नागरिकांना १५०० झाडांचे वाटप करण्यात आले. नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांनी आपल्या प्रभागातील कचऱ्यापासुन तयार केलेला खत यावेळी झाडासोबत नागरिकांना देण्यात आला. ही योजना संपूर्ण लातूर शहरात राबवण्यात आली तर शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होऊन खऱ्या अर्थाने हरीत लातूर ही संकल्पना साकार होईल.
पालकमंत्री संभाजी पाटील व राज्याचे वनमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी प्रत्येक घरात एक झाड लावण्याची योजना राबविण्याची घोषणा केली होती. त्याअंतर्गत महापौर सुरेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ झाला. नगरसेवक अजित पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी प्रभागातील कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पात तयार झालेला खत आणि प्रभागातील प्रत्येक घरासाठी एक याप्रमाणे १५०० झाडांचे वाटप यावेळी करण्यात आले. मजगे नगर येथील महाराष्ट्र विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात विद्याथ्र्यांना मार्गदर्शनही करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर देविदास काळे, स्थायी समितीचे सभापती शैलेश गोजमगुंडे, शिरीष कुलकर्णि, जफर पटेल, निलकंठराव पवार, संभाजीराव पाटील, नगरसेवक चंद्रकांत बिराजदार, नगरसेविका रागिनी यादव, भाग्यश्री शेलके, सरिता राजगिरे, श्वेता लोंढे, शोभा पाटील, वैशाली यादव, वर्षा कुलकर्णी, स्वाती घोरपडे, माजी नगरसेवक गोरोबा गाडेकर, शाखा अभियंता काझी, अकरम शेख, मुख्याध्यापक गोविंद शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती.




























































