
घाटकोपर ते वर्सोवा धावणाऱया मुंबई मेट्रो वनने प्रवाशांच्या सोयीसाठी ‘वन मुंबई, स्मार्ट कार्ड’ सेवेत आणले असून त्यामुळे कोविडकाळात आता प्रवाशांना रांगेत उभे राहण्याची काहीही गरज राहणार नाही. मुंबई मेट्रो वन, एक्सिस बँक आणि रुपे यांनी हे ‘वन मुंबई’ कार्ड सोमवारी लाँच केले.
रिलायन्स इन्फ्राच्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल ) याबाबत सांगितले की, हे कार्ड मुंबईकरांसाठी विनासंपर्क कॅशलेस प्रवासासाठी खास डिझाईन केले आहे.
























































