बालेवाडीत मेडीकल चालकाला लुटणाऱ्याला अटक

253

बालेवाडीत मेडीकल चालकावर वार करुन गल्ल्यातील 23 हजारांची रोकड चोरणाऱ्याला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी रात्री साडेआठच्या सुमारास बालेवाडीतील साईचौकात घडली होती. राजू प्रतापराम प्रजापती (वय 24, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी उमेदराम चौधरी (वय 21, साई चौक बालेवाडी ) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास उमेदराम न्यू अंबिका मेडीकलमध्ये काम करीत होते. त्यावेळी तेथे चोरीच्या उद्देशाने आलेल्या राजूसह तिघांनी उमेदरामवर चाकूने हल्ला करीत त्यांना जखमी केले. त्यानंतर गल्ल्यातील 18 हजारांची रोकड आणि उमेदराम यांची सोन्याची चेन असा 23 हजारांचा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या