एटीएममध्ये अश्लील कृत्य करणारा अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

एटीएममध्ये अश्लील कृत्य करणाऱ्याला नवघर पोलिसांनी अटक केली. अश्लील कृत्याचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

मुलुंड पूर्वच्या हरिओम नगर येथे एका सरकारी बँकेचे एटीएम आहे. रात्री अडीच वाजता अटक व्यक्ती ही पैसे काढण्याकरिता एटीएममध्ये आली होती तेव्हा तक्रारदार तरुणीदेखील त्या एटीएममध्ये पैसे काढत होती. तिला पैसे काढण्यास अडचणी येत होत्या तेव्हा अटक व्यक्तीने तरुणीला मदतीकरिता विचारणा केली. तरुणीने मदत घेणास नकार दिला तेव्हा अटक व्यक्तीने अश्लील कृत्य केले. तरुणीने मोबाईलमध्ये अटक व्यक्तीचे कृत्य रेकॉर्ड केले. त्यानंतर तो पळून गेला. तरुणीने हा प्रकार गस्तीवर असलेल्या पोलिसांना सांगितला. सहायक पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या पथकाने पाठलाग करून त्या तरुणाला ठाण्याच्या कोपरी परिसरातून ताब्यात घेतले. तरुणीने हा व्हिडीओ ट्विट केला होता. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.