तरुणीचा विनयभंग करणाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बारमध्ये तरुणीच्या विनयभंगप्रकरणी डॅमैना गेटराचेव्ह अंकाणे या परदेशी नागरिकाला कुलाबा पोलिसांनी अटक केली. तक्रारदार तरुणी ही तिच्या मित्रांसोबत कुलाबा येथील बारमध्ये आली होती. बाथरूममध्ये जात असताना एकाने तिचा हात पकडला तेव्हा तिने त्याच्या श्रीमुखात भडकावली. बारच्या कर्मचाऱ्यांनी याची माहिती कुलाबा पोलिसाना कळवली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॅमैनाला अटक केली. डॅमैना इथियोपियाचा नागरिक आहे.