
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पश्चिम बंगालमध्ये 1 हजार किलोंचा विस्फोटकांचा साठा सापडला आहे. पश्चिम बंगालच्या स्पेशल टास्क पथकाने ही कारवाई केली असून या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही विस्फोटकं एका वाहनात ठेवण्यात आली होती. हे वाहन ओडिशाहून पश्चिम बंगाल येथे जात होते. बंगालच्या उत्तरेला 24 परगणा जिल्ह्यात ही विस्फोटकं पोहोचवली जाणार होती. पण त्यापूर्वीच कारवाईत ही जप्त करण्यात आली आहेत. एकूण 27 पोत्यांमध्ये पोटॅशिअम नायट्रेटपासून बनलेली विस्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं इंद्रजीत भूई आणि पद्मोलोचन अशी आहेत.
West Bengal Special Task Force (STF): 1000 kg of explosive substance (Potassium Nitrate) recovered (in 27 gunny bags) from two people- Indrajit Bhui and Padmolochon Dey -travelling in a vehicle from Odisha to North 24 Parganas district in West Bengal today. Both arrested. pic.twitter.com/PDeJfewcjJ
— ANI (@ANI) March 9, 2019
























































