डोंगरीत कांदे चोरले

290

कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. दीडशे ते दोनशे रुपये किलोवर कांदा पोहोचला आहे. या परिस्थितीचा फायदा चोरांनीही उठवला आहे. डोंगरीच्या भाजी मार्केटमधून चोरटय़ांनी 168 किलो कांदा चोरल्याची घटना घडली. त्या कांद्याची आजघडीला 21 हजार 160 रुपये किंमत आहे.

डोंगरीच्या नवरोजी हिल रोडवर हे भाजी मार्केट आहे. तिथे अकबर शेख यांचा कांदा-बटाटा विक्रीचा स्टॉल आहे. कांद्याच्या 22 गोणी त्यांनी स्टॉलमध्ये ठेवल्या होत्या. 6 डिसेंबरला सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी स्टॉल उघडला असता सर्व गोणी चोरीला गेल्याचे त्यांना दिसले. त्यांनी इतरांच्या स्टॉलवर चौकशी केली असता शेजारच्या इरफान शेख यांच्या स्टॉलमध‘नही 56 किलो कांद्याची गोण चोरीला गेल्याचे त्यांना समजले. दोघांनीही डोंगरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी साबीर महम्मद शफीशेख (33) या चिकन विक्रेत्यासह त्याचा मेहुणा इम्रान शेख (30) या दोघांना अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या