उद्या आयफोनचे फक्त तीन फोन लाँच होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अ‍ॅपल कंपनी दरवर्षीप्रमाणे 9 सप्टेंबरला आपली नवी सीरीज करण्याची शक्यता आहे. अ‍ॅपलच्या इव्हेंटमध्ये केवळ आयफोन 18 चे तीन फोन लाँच करण्यात येणार आहेत. यामध्ये आयफोन 18 प्रो, आयफोन 18 प्रो मॅक्स आणि अ‍ॅपलचा पहिला फोल्डेबल आयफोन लाँच केले जातील. यावेळी अ‍ॅपलचा बेस मॉडेल आयफोन 18 लाँच केला जाणार नाही. कारण, गेल्या काही दिवसामध्ये मेमरी चिपच्या किंमतीत प्रचंड वाढ झाल्याने आयफोन 18 ला फटका बसला आहे. मागील वर्षभरात 256 जीबी मेमरी चिपची किंमत तब्बल 400 टक्क्यांनी वाढली आहे.