शिवसेनेने उजळला चौकचा थांबा: आ. मनोहर भोईर यांच्या हस्ते हायमास्टचे उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेच्या प्रयत्नातून उरण चौकचा थांबा उजळला आहे. आ. मनोहर भोईर यांच्या हस्ते या हायमास्टचे उद्घाटन करण्यात आले.

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील चौक दत्त मंदिरा जवळील थांब्यावर शाळकरी विद्यार्थी, प्रशासकीय कामांसाठी तसेच इतर ठिकाणी ये-जा करणा-या नागरिकांची रहदारी सुरू असते. संध्याकाळ नंतर याठिकाणी अंधाराचे साम्राज्य असल्याने चौकमध्ये ये-जा करणा-या नागरिकांना विशेषतः महिला वर्गाला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत परीसरातील नागरिकांनी राजिपरीषद सदस्य व जिल्हा नियोजन समिती सदस्य मोतीराम ठोंबरे यांच्याकडे खंत व्यक्त केली होती. यावेळी  मोतीराम ठोंबरे यांनी गांभीर्य लक्षात घेऊन चौक दत्त मंदिराजवळील थांब्यालगत हायमास्ट दिव्याची व्यवस्था केली. या हायमास्ट दिव्याचे उदघाटन मनोहर भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी उपसभापती श्यामभाई साळवी, माजी उपसरपंच सचिन मते, तंटामुक्त अध्यक्ष मनोहर देशमुख, चौक जिल्हा परिषद युवा सेना अधिकारी धनंजय राणे आदी उपस्थित होते.

 चौक दत्तमंदिराजवलील थांब्यावर हायमास्ट दिवा लागल्याने थांब्याजवळचा परीसर उजळून निघाला आहे.