‘सिंदूर 2.0’ साठी लष्कर सज्ज, लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कडक इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप सुरूच आहे. सध्या तात्पुरता युद्धविराम दिला असला तरी आवश्यकता भासल्यास ‘ऑपरेशन सिंदूर 2.0’ साठी हिंदुस्थान लष्कर, तिन्ही संरक्षण दले पूर्णपणे सज्ज आहेत, असा सज्जड इशारा लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला नाव न घेता दिला. सध्या आम्ही तिन्ही दलांमधील समन्कय वाढवण्यावर आणि पुढील युद्धासाठी स्वत:ला सज्ज करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पुण्यातील खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीच्या (एनडीए) 150 व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलन सोहळा आज पार पडला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना द्विवेदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर 2.0 बाबत मोठे वक्तव्य करत पाकिस्तानला नाव न घेता इशारा दिला आहे.

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले, गेल्या काही काळात आपण पाहिले आहे की, युद्ध हे 24 तास आणि सातही दिवस सुरू असते. आजची युद्धभूमी इतकी पारदर्शक झाली आहे की, प्रत्येक हालचाल समोरच्या बाजूला कळत असते. त्यामुळे आपल्या सैनिकांचे तसेच सीमावर्ती भागातील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली तैनाती आणि सुरक्षा या बाबतीत खूप साकधगिरी बाळगावी लागते. माहिती युद्ध तेव्हीच यशस्की होते, जेक्हा संपूर्ण देश एकत्र येतो आणि माहिती देणाऱ्या लोकांनर विश्वास ठेवतो. जर असे झाले तर मी तुम्हाला खात्री देतो की, जो देश एकमेकांवर आणि या सर्क संबंधित घटकांवर विश्वास ठेवतो तो नेहमीच युद्ध जिंकतो. जेव्हा युद्धाची गती खूप वेगवान होत असते तेव्हा संसाधनांच्या मर्यादेत राहून अतिरिक्त मदतीची आवश्यकता असते, जेणेकरून जलद निर्णय घेता येतील. अनेक तंत्रज्ञान व संसाधणे हाताळण्यासाठी ऑटोमेशनची गरज असते आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, असेही त्यांनी सांगितले.

येत्या दोन ते तीन वर्षांत थिएटर कमांड

हिंदुस्थानच्या तिन्ही संरक्षण दलांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधण्यासाठी राबवण्यात येत असलेली ‘थिएटरायझेशन’ची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून येत्या दोन ते तीन वर्षांत ‘थिएटर कमांड’ची व्यवस्था प्रत्यक्ष पाहायला मिळेल. थिएटरायझेशनबाबत सर्व चर्चा चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीमध्ये पूर्ण झाल्या आहेत. त्याचा अहवाल संरक्षणमंत्र्यांकडे सादर करण्यात आला आहे. तिन्ही दलांमध्ये समन्वय साधताना संबंधित अधिकाऱ्यांना तडजोडीची भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सैन्याची उभारणी, प्रशिक्षण आणि देखभालीची जबाबदारी सैन्यदल प्रमुखांकडे तर मोहिमेवेळी तिन्ही दलांमधील समन्वयाची, प्रत्यक्ष कारवाईची जबाबदारी थिएटर कमांडवर असेल, अशी रचना नव्याने करण्यात येत आहे, अशी माहिती लष्करप्रमुख द्विवेदी यांनी दिली.